Share

राज्यात हळूहळू सगळं खूलं करायचं आहे, पण…

Published On: 

नाशिक- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते ते आता पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार’असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

‘राज्यात नवरात्रौत्सवादरम्यान सर्व उत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीदरम्यान नियम लागू होतील. सध्या लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. तसेच कावडीवाल्यांनी देखील गडावर येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. राज्यात हळूहळू सगळं खूलं करायचं आहे. पण सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जाईल,’ असेही भुजबळ म्हणाले.

तर टोपे म्हणाले,आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितल. नियम पाळणं खूप महत्वाचं त्यामुळे सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्वाचं आहे. नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. RTPCR टेस्टचा रेट 800 रुपयांपर्यंत आणल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा अहमदनगर येथे पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी अनलॉकबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!