Share

व्हॉट्सअॅपवर आलेली अॅमेझॉन गिफ्टची लिंक ओपन करताय ? होऊ शकते ‘हे’ नुकसान

Published On: 

मुंबई: व्हॉट्सअॅप या सामाज मध्यमाचा वापर करत नाही असे लोक सापडने अशक्य आहे. तर यावर नेहमीच ग्राहकांना अनेक ऑफर असणाऱ्या लिंक पाठवल्या जातात. मात्र अशा लिंक धोकादायक असून युजर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर अॅमेझॉनकडून मिळणाऱया फ्री गिफ्टची लिंक पाठवण्यात येत आहे. अशी लिंक आली असेल तर सावधान. कारण हा बनावट मेसेज असून त्यामुळे युजर्स मोठय़ा स्पॅममध्ये अडकू शकतात.

या मेसेजमध्ये एक लिंक पाठवण्यात येत असून त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत गिफ्ट जिंकण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक सर्व्हेचे पेज ओपन होते. त्यावर वैयक्तिक माहिती घेतली जाते. युझरचे वय, अॅमेझॉनला तुम्ही किती रेटिंग द्याल, असे अनेक प्रश्न विचारले जातात. याशिवाय अँड्रॉईड फोन किंवा आयफोन यापैकी कोणत्या स्मार्टफोन वापरता, असा प्रश्नही विचारला जातो.

या पेजवर एक टायमर आहे, त्यामध्ये युजर फसतो. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर युजरला त्यांच्या स्क्रिनवर काही गिफ्ट बॉक्स दिसतात. त्यावर क्लिक केल्यानंतर स्मार्टफोन जिंकल्याचे सांगितले जाते. परंतु हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला ते क्विझ पाच गुप किंवा 20 व्यक्तींसोबत शेअर करण्यास सांगितले जाते. अशा कोणत्याही सर्व्हेमध्ये अनेकदा युजरला कोणतेही गिफ्ट मिळत नाही. परंतु युजर यात अडकला जातो. या क्विझचं युआरएल नकली आहे. युजर्सची फसवणूक होऊ शकते. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!