Share

कोरोनावर मात करून आमदार लहू कानडे यांची कामकाजाला सुरुवात

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीरामपूर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. मागील महिन्यात त्यांना व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. मुंबईतील नामांकित रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

श्रीरामपूर शहरातील शिवाजीनगर परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते तसेच व्यावसायिकांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यापूर्वी आमदार लहू कानडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत आपल्या कामकाजाचा श्रीगणेशा केला. यावेळी तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

चाकोरी बाहेरची ‘चाकोरी’

माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, स्वामी समर्थ संगणक सेंटर व्यवस्थापक योगेश आंबेडकर, नगरसेवक आदिनाथ कराळे, योगाशिक्षक किशोर थोरात, ललित चोरडिया, आबासाहेब वाळुंज, विलास मुसमाडे आदींनी आमदार लहू कानडे यांचा सत्कार केला.

शिवसेनेच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाचा विळखा ; अतिदक्षता विभागात उपचार सुरु

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!