Share

शिवसेनेच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाचा विळखा ; अतिदक्षता विभागात उपचार सुरु

Published On: 

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामान्य नागरिकांसह आता सेलिब्रेटी आणि राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. आता, शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ते दाखल झाले आहेत. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी माजी मंत्री व शेतकरी चळवळीतील नेते सदाभाऊ खोत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

खडकवासल्यातून तब्बल ‘इतके’ टीएमसी पाणी मुठा पात्रात

कोरोनाने लोकप्राधिनिधींना घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून कोल्हापुरात ३ आमदार व एका खासदाराला कोरोनाची लागण झाली आहे. तर, १६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झालेल्या भाजपा नेते निलेश राणे यांनी काही वेळापूर्वीच अहवाल निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी शुभेच्छा देण्याऱ्यांचे आभार देखील मानले आहेत.

भाजपा नेते निलेश राणे यांचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह!

राज्यात काल (दि. २८ ऑगस्ट) रोजी १४ हजार ३६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील नवे रुग्ण दाखल होण्याची संख्या देखील १४ हजार पारच असल्याने रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर, ११ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ४७ हजार ९९५ झाली आहे, यातील एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सद्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!