नवी दिल्ली: कोरोनाच्या काळात मंदावलेले वाहन उद्योग आणि वाहन खरेदी यानां अनलॉक नंतर गती मिळाली आहे. तर आता वर्षाच्या शेवटी कार खरेदीदारांना मोठी वाहन खरेदीवर भरघोस सूट मिळवण्याची संधी मिळाली आहे. मात्र दुसरी कडे बाजारात होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे गाड्यांच्या किंमतीत १ जानेवारीपासून वाढ करण्यात येणार आहे.
भारतीय बाजारपेठेतील महिंद्रा या आघाडीच्या वाहननिर्मिती कंपनीच्या गाड्यांची किंमत येत्या 1 जानेवारीपासून वाढणार आहे. महिंद्राने प्रवासी आणि व्यावसायिक दोन्ही श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इनपूट कॉस्ट वाढल्याने आणि कमोडिटीच्या किंमतीमधील तेजीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते
महिंद्रा कंपनीकडून अगदी बजेट रेंजपासून ते एसयुव्ही श्रेणीतील अशा सर्वप्रकारच्या गाड्यांची निर्मिती केली जाते. आता प्रत्येक गाडीच्या किंमतीत नेमकी किती वाढ होणार, हे महिंद्राकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच महिंद्रा कंपनीकडून गाड्यांच्या काही मॉडेल्सवर डिस्काउंट देण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये महिंद्राच्या नव्या गाड्यांचा समावेश नाही. BS6 कंप्लायंट महिंद्रा गाड्यांसाठीची ही डिस्काउंट ऑफर होती. या डिस्काऊंट ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि अन्य ऑफर्सचा समावेश होता. ही ऑफर केवळ डिसेंबर महिन्यापर्यंतच लागू आहे.
महिंद्राची फ्लॅगशिप SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2.20 लाखांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, 50 हजारांचा एक्स्चेंज बोनसही मिळतो. तसेच 16 हजार ते 20 हजारापर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंटही महिंद्रा कंपनीकडून दिली जाते.त्यामुळे तुम्ही महिंद्रा गाडी घ्यायचा विचार करत असाल तर डिस्काउंट ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे आता 15 दिवस उरले आहेत.
येत्या जानेवारी महिन्यापासून किआ या कंपनीच्या गाड्यांच्या किंमतीमध्येही मोठे बदल होणार आहेत. गेल्याच वर्षी वाहननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या किआ कंपनीची मॉडेल बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय ठरली होती. मात्र, आता या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार असल्याने वाहनप्रेमींच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
त्याच बरोबर या आधी देखील देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीनं १ जानेवारीपासून आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याच जाहीर केल होत. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडे फक्त १५ दिवसांचा कालावधी उरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक ! सांडपाण्यात कोरोनाचा शिरकाव आयसीएमआरचा अहवाल
- पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांना देशापुढे झुकावेच लागणार- अजित नवले
- हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करावे : राज्यपाल कोश्यारी
- केंद्राचे वरातीमागून घोडे, दोन महिने उलटल्यानंतर करणार अतिवृष्टी भागाची पाहणी
- ‘मी ऊसतोड कामगाराचा मुलगा; ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार’

