नाशिक : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतची सायंकाळी 6 वाजेपर्यंतची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत घोषित करण्यात आली आहे; या आकडेवारीनुसार 512 कोरोना संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह असून केवळ 56 रूग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 808 दाखल कोरोना संशयीतांच्या 811 नमुन्यांची तपासणी आजतागायत करण्यात आली आहे, त्यातील 512 संशयीतांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, तर 56 रूग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, 244 संशयीतांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज अखेर 467 संशयीत रूग्णांना तपासणीअंती आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याने घरी सोडण्यात आले आहे. लासलगाव येथील पहिला कोरोना रूग्ण बरा झाला असल्याने त्यासही घरी सोडण्यात आले आहे, तर जिल्ह्यातील कोरोना बाधित दोन रूग्णांचा मृत्यु झाला आहे.
यांतील मालेगाव येथील एक रूग्ण धुळे वैद्यकीय महाविद्यालयात मृत झाल्याने त्याचा समावेश जिल्ह्यातील संसर्गित व मृतांमध्ये करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात 07, नाशिक महानगरपालिकेच्या रूग्णालयात 02, मालेगाव महानगरपालिका रूग्णालय 46, शासकीय रूग्णालय, मालेगाव 01 असे 56 संसर्गित जिल्ह्यात आढळून आले आहेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे. (सदरची आकडेवारी ही आज दि.17 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या अहवालानुसार आहे.)
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

