Share

सोलापुर : कांदा गडगडला.. मोठ्या आशेने आलेल्या बळीराजाच्या पदरी निराशा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्पुर्ते कांद्याकडे दुर्लक्ष केल होते. मात्र, सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊन लोकांना दिलासा मिळणार आहे.

गुरुवारी कांद्याला प्रति क्विंटल २० हजार रुपये दर मिळत असल्याची बातमी पसरली. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याच्या किंमतीत कमी केली आहे. परिणामी, आता कांद्याचे दर प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपये झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे. जवळपास ७०० ट्रक कांद्याची आवक झाल्याचा अंदाज आहे. अजूनही कांदा उतरविण्याचे काम सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे.

कांदा उत्पादन व विक्रीबाबत नाशिक जिल्ह्याचे नाव घेतले जाते. नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामुळेच नाशिक जिल्ह्याला कांद्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र सोलापूर जिल्हाही यात मागे राहिला नव्हता . नाशिक जिल्ह्याप्रमाणेच सोलापूर बाजार समित्यांमध्येही कांदा विक्री आता होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1203263393504710656?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1203262617701085189?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1203262494627614720?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!