मुंबई : भारतीय संघाचा आघाडीचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धची मालिका आणि आयपीएल स्पर्धेला मुकला आहे. मात्र श्रेयस हा दुखापतीतुन सावरत आहे आणि तो लवकरच मैदानात पुनरागमन करताना दिसेल. याचे संकेत खुद श्रेयसने एक व्हिडीओ शेअर करताना दिले आहेत.
भारतीय संघाचा आघाडीचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्दच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की अय्यरला शस्त्रक्रीया करावी लागली. शस्त्रक्रीयेमुळे अय्यरला आयपीएल स्पर्धेतुन माघार घ्यावी लागली होती. मात्र नुकताच त्याने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो सिमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. यावेळी प्रेक्षकातुन अय्यरसाठी विनोदी घोषणा ऐकु येत होत्या.
https://www.instagram.com/p/COu_seYpZwS/
यावेळी प्रेक्षक श्रेयसच्या दिशेने ‘एक रुपयकी पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ अशा घोषणा देत होते. हा व्हिडीओ शेअर करताना अय्यरने कॅप्शन देताना लिहीले आहे की,’मला एक नविन घोषणा सापडली आहे,’ असे लिहत मला पुनरागमनाची ओढ लागली आहे असे लिहीले. यदांच्या आयपीएल स्पर्धेत श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्वपद युवा रिषभ पंतच्या हातात देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- अतिरिक्त प्रभार सांभाळणाऱ्या मुख्याध्यापकांना विशेष वेतन देण्याची माध्यमिक शिक्षकभारतीची मागणी
- आमच्या पत्रांना हवं तर केराची टोपली दाखवा पण किमान जनतेच्या हिताचे निर्णय तरी घ्या : शेलार
- माणुसकी जिवंत आहे : आजीबाई पुरवतायत निराधार ज्येष्ठांना मोफत डबा !
- ख्रिस लिनने केले दिनेश कार्तिकला ट्रोल; कार्तिकने पण दिले ‘असे’ उत्तर
- जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर; केजमध्ये नियमांचे उल्लंघन करत दुकाने मात्र उघडी


