औरंगाबाद : सलग तीन वेळा औरंगाबाद मतदार संघाचे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला.
या पराभवानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे खासदारकीचा मोह अद्यापही सुटलेला नाही. कारण खैरे यांच्या वाहनावर मेंबर ऑफ पार्लमेंट चे स्टिकर लावून आजही चंद्रकांत खैरे सर्वत्र फिरत आहेत. खासदार नसतानाही खासदार की चे स्टिकर लावून फिरणारे कदाचित ते शहरातील पहिले व्यक्ती असेल.
गेली वीस वर्षे औरंगाबादचा खासदार पद भूषवणारे चंद्रकांत खैरे यांना पराभव करत एमआयएमचे यांनी इम्तियाज जलील यांनी या लोकसभा निवडणुकीत तीन लाख 88 हजार 957 घेतली.व चंद्रकांत खैरे यांचा त्यांनी 4हजार 659 मतांनी पराभव केला.
1999 पासून सलग चार वेळा औरंगाबाद मधुन चंद्रकांत खैरे लोकसभेवर निवडून गेले वीस वर्षे खासदार राहिलेल्या खैरेंनी कडवे आव्हान राहिले. या पराभवा नंतर खासदार खैरे यांनी आपल्या वाहनावरील खासदार लिहिलेले स्टिकर्स अद्यापही काढलेली नाही. नियमानुसार कोणतेही पद नसताना किंवा संसदेच्या व विधान विधिमंडळाच्या सदस्य तत्वं असताना वाहनावर एमपी किंवा खासदार लिहिणे चुकीचे आहे.


खासदार इम्तियाज जलील म्हणाले, त्यांची जबाबदारी आहे. खासदारकीचे स्टिकर्स काढून टाकवेते. कारण माझ्या वाहनालाही आमदारचे स्टिकर्स होते. मी आमदारकीचा राजिनामा दिला होता तेव्हा मी ते स्टिकर्स तात्काळ काढून टाकले होते. कदाचित खैरे यांना सवय असल्यामूळे त्यांनी ते काढले नसावेते.
संसदेचे नियम आहे. तुम्ही एकदा पद सोडले तात्काळ स्टिकर्स काढवे लागते. तुमच्याकडील ओळखपत्र जमा करावे लागते. खैरे यांनी लावलेल्या एमपीचे स्टिकर्स विषयी मला अनेक लोकांनी सांगितले. यासाठी त्यांनीच आता ते काढावेत असा सल्लाही विद्यामान खासदार इम्तियाज जलील यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

