मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणारला पाठिंबा दिला आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणीही केली आहे. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. भाजपने पहिल्या दिवसापासून नाणारला पाठिंबा दिला आहे. जनतेची भावना आता बदलली आहे.
प्रकल्प व्हावा असं लोकांचं मत आहे. कोकणात रोजगार आणि विकासाचा प्रकल्प व्हावा असं लोकांना वाटत आहे. या प्रकल्पाबाबतचे लोकांचे गैरसमज दूर झाले आहेत. स्थानिकांनी राज ठाकरें यांना त्यांची भूमिका सांगितली असेल. त्यामुळे राज यांनीही नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असेल. राज यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो, असं नितेश यांनी सांगितलं.
२०१८ मध्ये राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, असा इशारा दिला होता. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाणार प्रकल्प हा गेले अनेक दिवस चर्चेचा विषय ठरलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणामुळे गेले अनेक दिवस रखडलेला हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार ? असा प्रश्न अनेक कोकणवासियांना पडलेला आहे. आगामी काळात तरी हा प्रकल्प मार्गी लागणार का असाच वर्षेनुवर्षे रखडला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा’, ‘तुळजाभवानी’ भाडे तत्त्वावर देण्यासाठी पीएफचा अडसर दूर
- आक्रमक, रांगडया शैलीतील भाषणाने आ.धस यांनी विधिमंडळात लक्ष वेधले
- शेअर बाजारात फायदा झाल्याचे सांगून इंजिनिअरला २४ लाखांना फसवले
- ‘विधिमंडळातील ‘ते’ वक्तव्य चुकीचे, मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी’
- मास्क लावण्यास सांगितल्याने वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
