Share

अट्टल चोरट्याच्या ताब्यातून दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: 

औरंंगाबाद : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. ही कारवाई शुक्रवारी पडेगाव कचरा डेपो परिसरात करण्यात आली. शेख सिराज शेख सईद (वय १९, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) असे अटकेतील सराईत चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून शटर फोडी, बॅटरी चोरी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीची एक दुचाकी, नऊ बॅटर्या असा एकूण १ लाख ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी शनिवारी (दि.५) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सिराज हा सराईत चोर असून त्याने शहरातील विविध भागातून दुचाकी, वाहनांच्या बॅटरी चोरीसह कपड्याची दुकाने फोडली आहेत. अनेक गुन्हे त्याने साथीदाराच्या मदतीने केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सराईत चोर शेख सिराज हा पडेगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.

गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, जमादार चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, सुरेश काळवणे, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ, अनिल थोरे, नितीन देशमुख, मोहिनी चिंचोळकर, शिंदे आदींच्या पथकाने सापळा रचून शेख सिराज याला पडेगाव परिसरातून ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!