मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) पोलिसांच्या अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून तेव्हा दूध का दूध पानी का पानी म्हणणाऱ्या अनिल देशमुखांचे खरे सूत्रधार कोण? असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
याबाबत अतुल भातखळकरांनी ट्विट केले आहे. भातखळकर ट्विटमध्ये म्हणतात, ‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे असा सीताराम कुंटेंनी ईडीकडे जबाब दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दूध का दूध पानी का पानी म्हणून जोरजोराने ओरडणाऱ्या अनिल देशमुखांचे खरे सूत्रधार कोण कोण आहेत हे सत्य बाहेर आलेच पाहिजे.’ असे भातखळकर म्हणाले आहेत.
अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे असा सिताराम कुंटेंनी ईडीकडे जबाब दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
दूध का दूध पानी का पानी म्हणून जोरजोराने ओरडणाऱ्या अनिल देशमुखांचे खरे सूत्रधार कोण कोण आहेत हे सत्य बाहेर आलेच पाहिजे. pic.twitter.com/yscXRmV0AM— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 29, 2022
सीताराम कुंटे दिलेल्या जबाबात म्हंटले की, अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्यानं त्यांनी पाठवलेल्या यादीला नाकारत येत नव्हतं. अनिल देशमुख सध्या १०० कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात आहेत. राज्य सरकारनं नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर देखील सुनावणी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- “राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलायं ”, राऊतांचे टीकास्त्र
- ‘शूटर दादी’ च्या स्मरणार्थ युपी सरकार बनवणार ‘शूटिंग रेंज’
- महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण- संजय राऊत
- ‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा
- संभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

