Share

महिलेचे प्रसंगावधान, मंगळसूत्र चोराच्या हाती लागले तीन तोळ्यापैकी पाच ग्रॅम

Published On: 

औरंगाबाद : आंगण झाडत असताना, अचानक आलेल्या दुचाकीस्वाराने महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र महिलेने प्रसंगावधान राखत चोराच्या हाती तीन तोळ्यापैकी पाच ग्रॅम सोनेच हाती लागले. हि घटना गजानन नगर, हडको, एन 11 भागात सकाळी ८ च्या सुमारास घडली. सुनंदा शरद पाटील, वय 53 असे मंगळसूत्र चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे.

नेहमी प्रमाणे सकाळी आठच्या सुमारास सुनंदा पाटील ह्या घरासमोरील अंगण झाडत होत्या. हिरव्या रंगाच्या विनाक्रमांक दुचाकीवर चोरटा त्यांच्या घराच्या जवळ दबा धरून होता. अंगण झाडत असताना त्या रोड लगत आल्या. हीच संधी साधत दुचाकी वरील चोरट्याने त्यांच्या जवळ अचानक येत, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक ओढले, मात्र सुनंदा पाटील यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याच्या हाती तीन तोळ्यापैकी फक्त ५ ग्रॅम सोनेच लागले.

तत्पूर्वी चोरट्याने त्यांच्या घराजवळ दोन ते तीन चकरा मारल्या, परंतु सुनंदा पाटील यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका महिलेने चोराला विचारणा केली. परंतु तो त्या महिलेला न बोलता थोडे पुढे जाऊन दुचाकीवर दबा धरून बसला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

गजानन नगर येथील महिलेने प्रसंगवधान राखत आपल्या तीन तोळ्याच्या पैकी पाच ग्रॅम सोने नेता आले. मात्र त्याची भूक पाच ग्रॅमवर न भागता त्याने आपला मोर्चा राजाबाजारकडे नेत, तेथील एका वृद्धेचे तब्बल ९.५ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावत पळ काढला पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!