🕒 1 min read
औरंगाबाद : अमरावतीत दंगल घडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक शब्द काढला नाही. स्वतःला वाघ समजणारे शेपूट घालून घरी बसले. आता शिवसेनेत हिंदुत्व राहिले नाही. खरे हिंदूत्व भाजप जवळ आहे. बाळासाहेबांची पूर्वीची शिवसेना आता राहिलेली नसून ते असेपर्यंत शिवसेना हिंदूत्वावादी होती. त्यामुळेच हिंदुत्वाच्या नावाखाली इतके दिवस शिवसेना चालली. यापुढे तुमच्या जवळ हिंदूत्व म्हणून मिरवणारे कुणी मते मागण्यासाठी आली तर हातात खेटर घ्या व तोंडातील शिव्या काढून त्यांच्या तोंडावर मारा. केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी अशाप्रकारे शिवसेनेवर हल्लाबोल केला.
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब काळेंनी त्यांच्या समर्थकासह व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचा दानवेंनी सत्कार केला. पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना एकञित लढली. आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला. पण शिवसेनेने सत्तेच्या लालसेपोटी दगाफटका करून राज्यात अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले.
राज्यातील जनता व शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही तर त्यांची वीज कापली जात आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) मुख्यमंत्री असतांना त्याच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, बोंडअळी, दुष्काळ आदींचे अनुदान वेळेवर वाटप व्हायचे. परंतु महाविकास आघाडी सरकार येताच शेतकऱ्यांना नुसते आश्वासन देण्याचे काम सुरू आहे.
पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, कोरोनाच्या काळात दोन वर्षे केंद्रातील मोदी सरकारने देशातील गोरगरीब ८० कोटी जनतेला मोफत गहू तांदुळाचे वाटप केले. एवढेच नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे काम केले. १३० कोटी जनतेला मोफत कोरोनाची लस देण्याचा विक्रम केल्याने देशासह जगाच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नाव घेतले जात आहे. आगामी नगरपरिषद महानगर पालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करून दाखवू असा इशारा त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देर आए मगर दुरूस्त आए’, आ. सतिश चव्हाणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!
- या ताई फिरल्याचं चालतं, अन् विरोधी पक्षनेत्यांचं फिरणं…- आशिष शेलार
- औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यात फूट; आतातरी संपावर निघणार का तोडगा?
- ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; मुनगंटीवारांची टीका
- ‘हा’ तर महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा मोदी सरकारचा डाव- नामदेव पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
