Share

लक्झरी बससाठी 10 लाख रुपयांची मागणी; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: 

जालना : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील २६ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोनिका शिवाडी गाडेकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मोनिकाने रविवारी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मोनिकाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पारध पोलिसांनी सासू, सासरे आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

जळगाव सपकाळ येथील मोनिका गाडेकर हिचे लग्न २०१७ मध्ये शिवाजी गाडेकरसोबत झाले होते. लग्नानंतर मोनिकाचा पती शिवाजी गाडेकर, सासरा भालचंद्र गाडेकर आणि सासू बेबीबाई गाडेकर यांनी तिला तुझ्या माहेरहून लक्झरी बससाठी 10 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, असा आरोप करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून रविवारी मोनिकाने राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, मृत मोनिकाची आईृ शीला प्रभाकर मोडके याच्या फिर्यादीवरून पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारध पोलिसांनी तिन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!