Share

मोठी बातमी : २२ तारखेला होणार शरद पवारांचा शपथविधी

Published On: 

नवी दिल्ली : येत्या 22 जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळण्यासाठी 61 सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करता यावे, यासाठी पहिल्यांदाच शपथविधी सोहळा सभागृहाच्या चेंबरमध्ये इंटर-सेशन पीरियडदरम्यान पार पडेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 20 राज्यातील 61 सदस्य राज्यसभेवर निवडूण गेले होते.

‘ऊध्दव ठाकरे यांची दिल की बात राजकारण ढवळून काढेल’, संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

या निवडणुकीत मोठ्या चेहऱ्यांबाबत बोलायचे झाल्यास, मध्यप्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंह विजयी झाले. हे दोन्ही नेते, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तसेच महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले, भागवत कराड हे २२ तारखेला शपथ घेणार आहेत. तसेच, काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल राजस्थानमधून विजयी झाले होते.

राज्यसभेच्या 19 जागांसाठी 19 जूनला झालेल्या निवडणूकीत भाजपला 8 आणि काँग्रेसला 4 जागांवर विजय मिळाला होता. मागच्या वेळेस या 19 जागांपेकी भाजपला 9 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे, यावेळी भाजपला 1 आणि काँग्रेसला 2 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.

१ ऑगस्टचं आंदोलन भाजपाने आजच कसं केलं?: पशु व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!