🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ७ गडी राखुन पराभव केला. शिखर धवनच्या जागी संधी मिळालेल्या इशाननं ३२ चेंडूंत ५६ धावा केल्या. या खेळीत इशानने ५ चौकार व ४ षटकार खेचले. कर्णधार विराट कोहलीसह त्यानं दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
पदार्पणाच्या सामन्यात आत्मविश्वासानं खेळ करणाऱ्या इशाननं सामना संपल्यानंतर मैदानावर घडलेला एक किस्सा सांगितला. सामन्यानंतर युझवेंद्र चहल यानं घेतलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. जेव्हा अर्धशतक झाले, तेव्हा आम्ही पाहिलं की दोन-तीन सेकंद तू बॅटच उंचावली नव्हतीस. तुझं अर्धशतक झालंय, हे तुला माहित नव्हते का? तू थोडा नर्व्हस झाला होतास का?, असे प्रश्न चहलने त्याला या मुलाखतीदरम्यान विचारले.
???? Debut for India & debut on Chahal TV right away ????
DO NOT MISS: @yuzi_chahal chats up with @ishankishan51 after his superb batting performance in the 2nd T20I against England. ???????? – By @RajalArora #TeamIndia #INDvENG @Paytm
Full interview ???? ????https://t.co/X68QuvB55Y pic.twitter.com/iCKzbTewU1
— BCCI (@BCCI) March 15, 2021
यावेळी तो म्हणाला,”माझे अर्धशतक झालेय, हेच मला माहित नव्हते आणि जेव्हा विराट कोहली अभिनंदन करायला आला, तेव्हा मला ते समजलं. विराट भाई मागून ओरडला, ओए चारही बाजूला फिर आणि बॅट दाखव. सर्वांना बॅट दाखव, तुझी ही पहिलीच मॅच आहे.” इशान किशन आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं दुसरा सामना ७ विकेट्स राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली.
महत्वाच्या बातम्या
- इशानची दमदार खेळी, केला सचिन-धोनीसारख्या दिग्गजांना न जमलेला कारनामा
- आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हे पवारांचे भाकीत खरे ठरेल काय ?
- खासगीकरणाविरोधात आजपासून बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप
- “संघात स्वतःच स्थान वाचवण्यासाठी दुसऱ्यांना संधी नाकारू नका”
- वेस्ट इंडिजच्या महान बॅट्समन व्हिव रिचर्ड्स यांनी मोदींचे आभार; सत्य काय जाणुन घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
