नवी दिल्ली : देशातील लसीकरणाच्या गतीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आधीपासून राहुल गांधी लसीकरणावरुन मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यात २१ जूनपासून लसीकरणाची गती वाढणे अपेक्षीत होते. मात्र, अद्याप ती गती वाढलेली नसल्याचा आरोप राहुल यांनी या माध्यमातून केला आहे. राहुल यांच्या आरोपला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या संदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. जुलै महिना आला मात्र अद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. यावर गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता व्हॅक्सिन ‘१० जनपथ’ म्हणजे राहुल गांधींच्या घरुन नाही तर सरळ लोकांपर्यंत जात असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.
अब 10 जनपथ होकर नहीं जाता .. डायरेक्ट जाता है। https://t.co/4vgLDQcJth
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) July 2, 2021
कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अद्याप धोका कमी झालेला नाही. देशात पुन्हा तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे तिसरी लाट रोखायची असल्यास लसीकरणात वाढ हा एकमेव पर्याय आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान, पादुका १८ दिवस नाथमंदिरात मुक्कामी
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यात यावे, आ.अंबादास दानवेंची मागणी!
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
- ‘चूक करणाऱ्या प्रत्येकाला परिणाम भोगावे लागणार, यादी मोठी’; चंद्रकांतदादांना नेमकं काय सुचवायचंय ?


