Share

बंधपत्रित अधिपरिचरिकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

Published On: 

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे. कोविड-19 साथरोग तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरीचारीकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बंधपत्रित अधिपरीचारीकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मंगळवारी (दि. ९) विधान भवन, मुंबई येथे नागपूर विभागातील बंधपत्रित अधिपरिचारीकांच्या सेवा समस्यांसदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यात यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये या अधिपरिचारीकांना सेवेत कायम करण्यात आले तर काही जिल्ह्यामध्ये असे झाले नाही. ही उणिव दूर व्हावी आणि नागपूर विभागात भंडारा, गोंदिया जिल्हयात यापुढील भरतीप्रसंगी अशा अधिपरिचारीकांना प्राधान्याने कायम करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी दिले आहेत.

या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त अनुपकुमार यादव, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या बैठीकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांअंर्तगत भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व साकोली येथील नगर पालिकेच्या नळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात चर्चा करण्यात आली. या तीनही योजनांसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्री सुनिल केदार यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिले. या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता आणि अन्य आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी यावेळी दिल्या.

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; नाना पटोलेंनी केली मोठी घोषणा

विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीच झालो असतो – पृथ्वीराज चव्हाण

आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात संपूर्ण राज्यात ठरतोय लक्षवेधी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!