Share

… तर मग आता परप्रांतीयांना आमची परवानगी घ्यावी लागेल, CM योगींना राज ठाकरेंचा दणका !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना दणका दिला आहे.

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत योगी आदित्यनाथ यांच्या मजुरांबाबतच्या नव्या नियमाचा समाचार घेतला. उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं, असे ठाकरे म्हणाले.

raj thakre post

तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा, असेही ठाकरे म्हणाले.

तसंच ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही ह्याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी, अशी देखील ताकीद ठाकरेंनी दिली.

दरम्यान लॉकडाऊन दरम्यान उत्तरप्रदेशातील स्थलांतरित कामगारांना ज्या प्रकारे त्रास झाला आणि त्यांच्याबरोबर ज्या प्रकारचे गैरवर्तन झाले त्या पाहता त्यांच्या सामाजिक सुरक्षेची हमी घेत राज्य सरकार हे जाहीर करत आहे की, इथून पुढे कोणतेही राज्य परवानगीविना उत्तर प्रदेशच्या मजुरांना घेऊ शकत नाही, असे आदित्यनाथ म्हणाले. जर एखाद्या राज्याला कामगारांची गरज भासल्यास, त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकार सामाजिक सुरक्षेची हमी देईल, विमा प्रदान करेल आणि कामगार आणि कामगारांना सर्व प्रकारचे संरक्षण देईल, असे आदित्यनाथ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

इथून पुढे कोणतेही राज्य परवानगीविना उत्तर प्रदेशच्या मजुरांना घेऊ शकत नाही : आदित्यनाथ

#व्हायरल : हे सरकार आमचे नसून केवळ शिवसनेचे ! पृथ्वीराज चव्हाणांचे खळबळजनक विधान

#corona : राज्य आणि रेल्वेची जुंपली, CM ठाकरेंच्या आरोपावर गोयलांचे रात्री 2 वाजेपर्यंत ट्विट…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!