पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक रंगल्याच पाहायला मिळत आहे. भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील शिवाजी चौकात प्रचारसभा घेतली. यावेळी अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांसह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
अजित पवारांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांना काय झालंय हे माहित नाही. पण अलीकडच्या काळात ते जरा जास्तच जोरात आहेत, असं म्हणत त्यांनी ‘सो चुहे खाकर बिल्ली आली हज को’ अशी हिंदी म्हण वापरत टोला देखील लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ‘मोठ्या साहेबांवर माझी पीएचडी अजून बाकी आहे, मात्र आता मी अजित पवारांवर एमफिल करणार आहे. त्यासाठी काही प्राध्यापकांची देखील भेट घेणार आहे.’
‘अनेक प्रकार करूनही ते छाती ठोकपणे तेकसे बोलतायत ? याचा मी अभ्यास करणार आहे. त्यांच्यावर सिंचन प्रकरणातील केसेस अजून चालू आहेत, सरकार आल्यानंतर घाईघाईने राज्य सहकारी बँकेमध्ये क्लीन चिट दिली आणि पुन्हा याचिकाकर्ता उच्च नायायालयात गेला, तिथे पवारांना न्यायालयाने ठोकलं. राज्य सहकारी बँकेची, सिंचन घोटाळ्याची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेतायत. पवार कुटुंबियांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती कारखाने आहेत ? याची श्वेतपत्रिका काढावी,’ अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर गडकरींनाही देऊ शकतात’
- पोलीस आले धावून…मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे गर्भवती बचावली; पोलीस गाडीतच झाली प्रसुती
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात कडक निर्बध लागू, विनाकारण फिरण्यास मनाई
- ‘पंढरपूर महाराष्ट्राचं श्रद्धेचं ठिकाण आहे तिथे ह्या बदमाशाना जागा मिळता कामा नये’
- नितीन गडकरींनी बेळगावात मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये – संजय राऊत


