Share

पोलीस आले धावून…मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे गर्भवती बचावली; पोलीस गाडीतच झाली प्रसुती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पोलीस अनेकदा विविध अडचणीत अडकलेल्या नागरिकांसाठी धावून जात आपले कर्तव्य बजावत असतात. मग रेल्वे प्लॅटफॉर्मवर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला वेळीच हटवणे असो वा इतर कोणती अडचण ! आता एका गर्भवती महिलेसाठी मुंबई पोलीस देवदूत म्हणून वेळीच आले आणि या गर्भवतीसह तिच्या बाळाचे देखील प्राण वाचवले.

मुंबईच्या वरळी नाका परिसरात सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान एक महिला चक्कर येऊन पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरळी पोलिसांची मदत त्या महिलेसाठी पोहोचली. या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न बघता महिला पोलिसांनी त्या महिलेला पोलीस गाडीतूनच रुग्णालयात नेण्याचे ठरवले. यावेळी मार्गातच या महिलेची प्रसूती झाली आणि त्यानंतर त्यांना व त्यांच्या बाळाला सुखरूप रुग्ळ्यात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत, पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कर्तव्यदक्ष पोलिसांची पाठ थोपाटत एक फेसबुक पोस्ट केली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची फेसबुक पोस्ट –

एक महिला अचानक वरळी नाका येथे सायंकाळी 5 वा. च्या दरम्यान चक्कर येऊन पडल्या, अशी माहिती मिळाली असता तात्काळ वरळी पोलिसांची मोबाईल 1 व मोबाईल 5 ही वायरलेस वाहने सदर ठिकाणी हजर झाले असता महिला ही गर्भवती होती चक्कर येऊन पडल्याने तिला प्रस्तुती कळा चालू झाल्या होत्या. त्यांच्यासोबत सोबत त्यांच्या कुटुंबातील किवा ओळखीचे जवळ कोणीच नव्हते.

महिलेची परिस्थिती नाजूक होती. तरी वरळी पोलीस स्टेशन मधील महिला पोलिस उपनिरक्षक रेश्मा पाटील मॅडम- महिला कॉन्स्टेबल सपकळ मॅडम व ASI माने व स्टाफ यांनी तात्काळ वेळ न दवडता सदर महिलेस कोणताही विचार न करता रुग्णवाहिकेची ची वाट न पाहता पोलीस गाडी मध्ये घेऊन सोबत मदतीला पादचारी स्थानिक रहिवाशी असलेली मुलगी नामे प्रिया जाधव हिला मदतीला घेऊन नायर रुग्णालयाकरिता रवाना झाले.

https://www.facebook.com/vnnpatil/posts/10221813894115013

तरी सदर महिलेला अधिक त्रास होऊ लागला म्हणून सदर महिलेला गाडीतील महिला अधिकारी व महिला अंमलदार व स्थानिक मुलगी यांनी धीर दिला व महिलेची प्रस्तुती ही नायर रुग्णालय येथे पोहोचण्याआधीच पोलिस गाडी मधे सुखरूप झाली व महिला व बाळाचे प्राण वाचले. सदर महिला व बाळ हे सुखरूप असून महिला ही 7 महिन्यांची गरोदर असल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या महिलेस मुलगी झाली, हा क्षण सर्वांसाठी आनंदाचा होता, मोबाईल 1 वरील Asi माने, Hc वळवी, Pc कांबळे , pcd लोहार मोबाईल 5 वरील म पो उ निरीक्षक रेश्मा पाटील मॅडम व WPC सपकळ मॅडम यांचे केलेल्या कर्तव्या बद्दल अभिनंदन !!

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!