सिंधुदुर्ग : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण जग या आजारविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान औरंगाबादेत सारी या आजाराने डोके वर काढले आहे. औरंगाबादेत सध्या सारीचे २०० रुग्ण आहेत. कोरोना आणि सारी विरुध्द लढा देत असतानाच सिंधुदुर्गात (केएफडी) माकडतापेचा धोका निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग येथील दोडामार्गयेथे ११ तर सावंतवाडी येथे २३ रुग्ण आहेत. त्यातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग साठी (केएफडी) माकडताप हा आजार कोरोनापेक्षा अधिक गंभीर असून त्याबाबत योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माकडताप संशोधन व तपासणी केंद्र सुरू करण्यासाठी पन्नास लाख रुपये डीपीडीसी मार्फत जिल्हा परिषेदेकडे वळविले मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालयाने तो प्रस्ताव नामंजूर केला. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी, तत्कालीन पालकमंत्र्यांनी निधी देऊन ही केंद्र सुरू झाले नाही.
आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता अधिक बळी जाण्याची वाट न बघता दोडामार्ग येथील तपासणी केंद्र तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याकडून शासकीय मान्यता देऊ करा, असा आदेश संबंधितांना दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

