टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश उदयनराजेंच्या पथ्यावर पडणार आहे. परंतु, राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते साताऱ्यात बोलत होते.
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे उदयनराजेच असतील हे नक्की आहे. मात्र उदयनराजे यांच्यावर काय जबाबदारी असेल हे नक्की नसल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितल आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंवर कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, अद्याप तसे काहीही ठरलेले नाही. माझी आणि त्यांची उद्या, परवा भेट होणार आहे. त्या वेळी पुढील काय ते ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद मिटविण्यात आला होता. तरीही काही लोक रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन करतात, हे मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी नेमकी कोणाची काय भूमिका आहे, हे समजून घेऊन त्यावर तोडगा काढावा लागले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
तिहेरी तलाक आज राज्यसभेत, बहुमाता अभावी विधेयक रखडण्याची शक्यता
साताऱ्याच्या बालेकिल्ला आमचाचं; पवारांचं शिवेंद्रराजेंना थेट आव्हान
इतर पक्षातून भाजपात येणाऱ्या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्वार्थ असतो : चंद्रकांत पाटील

