टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेके नेते भाजप – सेनेत प्रवेश करत आहेत. खास करून बाहेरून येणारे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. यावरून भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. स्वार्थासाठीच इतर पक्षातील लोकं ही भाजपमध्ये येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, इतर पक्षातून भाजपात येणाऱ्या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्वार्थ असतो. मात्र हा स्वार्थ भल्याचा असतो सत्तेबरोबर राहिल्याने काम होतात, समाजासाठी उपयोगी पडता येत म्हणून सत्ताधारी पक्षाबरोबर किंवा निवडणुकीत यश मिळणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा कल नेत्यांचा असतो. तसेच अनेकजण अजूनही भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेनेत जोरदर इनकमिंग सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचित आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला भाजप युतीचं मुंबईत तरी तगड आव्हान असणार आहे.

