Share

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणे हा माझ्यासाठी मोठा धक्का – धनंजय मुंडे

Published On: 

परळी : नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचं म्हटलं होत.

मात्र पंकजा मुंडे यांना जरी धक्का बसला नसला तरी पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांना भाजपने आमदार न बनवल्याचा नक्कीच धक्का बसला आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी हे बोलून दाखवल आहे. ‘मी भाजप सोडलेला बराच काळ झाला आहे, त्यांनतर भाजपमध्ये नव पर्व सुरु झाल आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी का दिली नाही हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, त्यावर मी भाष्य करू नये. मात्र, एखादा मंत्री त्याच्या विधानसभा मतदारसंघातून पराभूत होतो तेव्हा त्या नेत्याला पुनर्जीवित करण्यासाठी उमेदवारी देण साहजिक आहे. पण मला सुद्धा आश्चर्य झाल की त्यांना विधानपरिषदेवर का घेतल नाही. हा माझ्या साठी खूप मोठा आश्चर्याचा धक्काच होता.’ आशा भावना धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवल्या आहेत.

सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ? अवधूत वाघांचा खोचक सवाल

दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होत की, “आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस…साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद”.

तब्बल ४ लाख विद्यार्थ्यांना नापास करण्यामागे राज्य सरकार व पवार यांचा हेतू काय ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!