मुंबई : सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटिंगला सुरुवात झाली असली तरी सेटवर कोरोनाचा धोका कायम आहे. ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ या मालिकेच्या सेटवरील एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर ताबडतोब मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.
‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ या मालिकेतील कलाकार जगन्नाथ निवंगुणे यांना रविवारी कोरोना झाल्याचं निदान झालं. जगन्नाथ यांच्यावर सध्या वरळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ते सुखरुप आहेत. मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका ते साकारतात. आणि अँड टीव्हीवर ही हिंदी मालिका प्रसारित केली जाते. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी गोरेगाव इथे या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. निवंगुणे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. त्यांनी कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती. आता निवंगुणे यांच्या संपर्कात आलेल्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सध्या मालिकेच्या सेटवरही तणावाचं वातावरण आहे.
याआधी शूटिंग दरम्यान तेलुगू टीव्ही अभिनेत्री नव्या स्वामी हिला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. जवळपास तीन महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शूटिंग बंद होतं. आता काही अटीशर्तींवर हे शूटिंग सुरु केलं असलं तरी कोरोनाचं आव्हान कलाकारांसमोर आहे.
आनंदाची बातमी : मुंबईत अनेक लोकप्रिय मालिकांच्या शूटिंगला सुरुवात
आनंदाची बातमी : राज्यात गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

