🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पुढचे १५ दिवस फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेले आदेश पाळा. तसंच राज्य सरकारने काही निर्णय घेताना त्याची मुदत ३१ मार्च सांगितली आहे परंतू आता पुढील आदेश निघेपर्यंत सरकारकडून दिलेले आदेश पाळावेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे. गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे. लग्न असो की कोणतंही कार्य, दहावं-तेरावं कार्य असलं तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी केलं. पुढचे आदेश निघेपर्यंत जे निर्णय घेतलेत त्याची अंमलबजावणी सुरु राहील. तसंच पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी होमगार्ड लागणार आहेत ते देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.
दरम्यान, आज संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा त्यांनीघेतला. यावेळी पंतप्रधान आणि केंद्रिय आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच काळजी घ्या पण घानारून जाऊ नका असंही आवाहन अजित पावर यांनी केलं आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
