🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये राहते. यात विशेषत: महाराष्ट्रात रोजगाराअभावी स्थलांतर केलेल्या उत्तर भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता हेच लोक शहरातील बर्याच जागांवरील निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, कल्याण, अकोला अशा अनेक शहरांत उत्तर भारतीय लोक मोठ्या संख्येने आहेत. राजधानी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये ४५ हून अधिक विधानसभा निवडणुकांच्या जागा आहेत. त्याखेरीज ठाणे-कल्याण, नागपूर, औरंगाबाद, पुणे इत्यादी शहरांच्या जागा पहिल्या तर १०० हून आशिक जागांवर उत्तर भारतीय नागरिक आहेत. राज्यात उत्तर भारतीय कॉंग्रेसचे पारंपारिक मतदार आहेत. मोदी लाटेनंतर अनेक उत्तर भारतीयांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धारली होती. त्यात विद्या ठाकूर यांना एनडीए सरकारमध्ये उत्तर भारतीतील जनतेचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने राज्यमंत्रीपद दिले. परंतु भाजप शिवसेना अजूनही उत्तर भारतीय लोकांना तिकीट देण्यास टाळाटाळ करते.
मुंबई आजूबाजूच्या शहरांमध्ये अजूनही उत्तर भारतीय लोकांना कॉंग्रेस तिकीट मिळू शकते. देशाच्या निवडणुकातील सध्याच्या चर्चा पाहता भाजप शिवसेनेच्या तुलनेत कॉंग्रेस अजूनही उत्तर भारतीयांना तिकीट देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांचा कल कोणाकडे जास्त आहे हे तर भविष्यातच कळेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या २88 जागा असून भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष २० जागा जिंकू शकतात. त्याचवेळी, कॉंग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष ५५ जागा जिंकू शकतात. इतरांना २८ जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी आणि बेरोजगारी. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस ही सर्वात मोठी निवड आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177907347496161280?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177906586250989570?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177905343059259392?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
