सध्या फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) ची संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. कतारमध्ये सध्या ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील फुटबॉल चाहते उत्सुक आहेत. अशा परिस्थितीमध्ये 29 नोव्हेंबर हा दिवस फिफा विश्वास 2022 मधील बॉलीवूडसाठी खास दिवस असणार आहे. कारण आज बॉलीवूडची डान्सिंग क्वीन नोरा फातेही (Nora Fatehi) फॅन फेस्टमध्ये दमदार परफॉर्मन्स देणार आहे. या परफॉर्मन्ससाठी नोरा जोरदार तयारी करत आहे.
20 नोव्हेंबर पासून कतारमध्ये सुरू झालेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये आज बॉलीवूड सुपरस्टार नोरा फातेही Live परफॉर्मन्स करणार आहे. नोराचे चाहते तिचा हा परफॉर्मन्स बघण्यासाठी खूप उत्सुक आहे. दरम्यान, नोराने तिच्या लाईव्ह परफॉर्मन्सच्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा तिच्या ग्रुपसह डान्सची तयारी करत घाम गळताना दिसत आहे. तर नोराचे चाहते तिच्या या मेहनतीचे कौतुक करताना दिसत आहे.
नोरा फातेही ही इंस्टाग्रामवर जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेली अरब कलाकार आहे. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 42 दशलक्ष फॉलोवर्स आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांमधील ‘दिलबर’ या हिट गाण्याने युट्युबवर एका युनिट वर एक अब्ज हिट मिळवणारी ती पहिली अरब आफ्रिकन महिला कलाकार ठरली आहे.
FIFA World Cup 2022 | फिफा परफॉर्मन्ससाठी नोराची जोरदार तयारी, आज करणार Live सादरीकरणhttps://t.co/ygV9aGG79g
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) November 29, 2022
फिफा विश्वचषक 2022 मध्ये सातत्याने चढ-उत्तर बघायला मिळत आहे. त्यामुळे या विश्वचषकाची उत्सुकता चाहत्यांमध्ये अधिकच वाढत आहे. दरम्यान, या विश्वचषकातील आजचा दिवस बॉलीवूड प्रेमींसाठी खास असणार आहे. कारण आज फिफा फॅन फेस्टिवलमध्ये बॉलीवूड डान्सिंग क्वीन नोरा फतेही लाईव्ह परफॉर्मन्स सादर करणार आहे. चाहत्यांना फुटबॉल सामन्यासह नोराच्या शानदार परफॉर्मन्सची उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Winter Update | उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला, तर विदर्भातील ‘या’ जिल्ह्यामध्ये झाली सर्वात कमी तापमान नोंद
- Kishori Pednekar | “दबावतंत्र कसा असतो हे दाखवायला मी आलेय”, किशोरी पेडणेकरांचा घणाघात
- Sushma Andhare | “राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात ही भाजपची स्क्रीप्ट”, सुषमा अंधारे आक्रमक
- Devendra Fadanvis | “उदयनराजे यांच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत…”, देवेंद्र फडणवीसांचं यांचं मोठं विधान
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी मानले उदयनराजे भोसले यांचे आभार, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

