नवी दिल्ली: दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांकडून पाळण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. काही ठिकाणी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावरून देशात वातावरण चांगलेच पेटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरकारची भूमिका मांडली.
नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे जनक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आमच्या सरकारशिवाय इतर कोणीही यथोचित सन्मान केला नाही. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच चालत आहोत. शांती आणि ऐक्य हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. याबरोबरच आम्ही समाजातील गरीबात गरीब व्यक्तींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.
We are walking on the path shown by Dr. Babasaheb Ambedkar. At the core of Dr. Ambedkar's ideals is peace and togetherness. Working for the poorest of the poor is our mission: PM Modi pic.twitter.com/SOhWvQ4Eb5
— ANI (@ANI) April 4, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

