Share

सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

Published On: 

नवी दिल्ली: लग्नानंतर मुलीच्या माहेरकडील संपत्तीवर आपलाच हक्क असल्याचे काही जावयांचा समज असतो. मात्र आता अशा स्वार्थी जावयांसाठी केरळ उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनेकदा मुलींचा हुंडयासाठी छळ केला जातो. यावरून आता या निर्णयाचे अनेक स्तरातून कौतुक कले जात आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, जावई सासरच्या मालमत्तेत किंवा इमारतीत हक्क सांगू शकत नाही. सासऱ्याच्या मालमत्तेवर जावयाचा कायदेशीर अधिकार नसल्याचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे.

केरळमधील कन्नूर  इथल्या तैलीपरंबा गावाचे रहिवासी असलेल्या डेव्हिस राफेल  यांनी त्यांचे सासरे हेंड्री थॉमस  यांच्या संपत्तीवर दावा केला होता. या प्रकरणी हेंड्री थॉमस यांनी पाययन्नूर इथल्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करून, आपला जावई आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण करत असून, त्याच्यावर कारवाई करावी आणि आपल्याला आपल्या घरात शांतपणे जगू द्यावे अशी मागणी केली होती.

त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. अनिल कुमार यांनी डेव्हिस राफेल यांचा हा दावा फेटाळून, जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी सासऱ्याला दिलासा मिळाला आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!