Share

याआधीच्या कुठल्याचं सरकारनं सैन्याचे श्रेय निवडणुकीसाठी घेतले नाही : शरद पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पावर यांची अकोल्याची सभा आज चांगलीचं गाजली आहे. बाळापुर येथे संग्राम गावंडे यांच्या प्रचारासाठी आले असता शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाचं समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांना गेली ५ वर्ष फसवणाऱ्या सरकारला पाय उतार करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली. मात्र, ही घोषणा फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा हल्ला झाला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले.मात्र याचा उपयोग सरकारनी राजकारणात केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ही मोठी युद्ध झाली. इंदिरा गांधी यांनी देशाचा भूगोल बदलला असल्याचं बोलं जात. मात्र त्यांनी कधीही याचे श्रेय स्वतःकडे अथवा निवडणुकीसाठी घेतले नाही. मात्र हे सरकार आम्हीचं स्वतः जाऊन कारवाई करत असल्याचा अविर्भाव आणत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

आज शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. मुख्यमंत्र्यांनी कापसाला भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र कापसाला भाव नाही, सोयाबीनीला भाव नाही. एकदा कांद्याचे भाव वाढले तेव्हा लोकसभेत माझ्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. विरोधक कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले होते. तेव्हा कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या माळा घाला मी शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय स्वस्त बसणार असे ठणकावून सांगितले होते. मात्र आजचे राज्यकर्ते तसं करताना दिसत नाही असा टोलाही पवारांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181887067610959872?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181884010567323649?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181882192571424768?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!