Share

‘मुंडे साहेबाच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते’

Published On: 

धुळे : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. “कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ते हलक्या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा देखील झक मारेल. प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचले. खडसे दाऊदच्या बायकोसोबत फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले. नाथाभाऊंची चूक एवढीच की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, अस देखील अनिल गोटे म्हणाले आहे.

संतापामध्ये मी कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

बहुजनांच्या वाघाची १०० गाड्यांसह ‘ग्रँड एण्ट्री’, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

“देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थानं, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर मुसलमान आला तरी चालेल पण अनिल गोटे येता कामा नये यासाठी पैशाचा महापूर आला होता. पण संतापामध्ये मी कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही”.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!