भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली.
यानंतर, कमलनाथांच्या या वक्तव्याचा भाजपसह अन्य पक्षांनी देखील जाहीर निषेध केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील संताप व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. महिलांच्या सन्मानाचा बुरखा चढवणाऱ्या काँग्रेसने आणि सोनिया गांधींनी यावर लगाम घालावा, अशी टीका मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली होती.
दरम्यान, यानंतर चूक मान्य करण्याऐवजी तो एक सामान्य शब्द आहे असं म्हणत आपल्या चुकीचं समर्थन केलं होतं. इमरती देवी यांना या अपमानजनक वक्तव्यानंतर रडू कोसळलं होतं. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी केलेल्या अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्याची निंदा केली आहे.
कमलनाथांच्या वक्तव्याबद्दल महिला आयोगाने स्पष्टीकरण मागितलं असून निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा सूचना देखील दिल्या आहेत. आता, काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कमलनाथ माझ्या पक्षातील नेते आहेत, पण व्यक्तिशः त्यांनी वापरलेली भाषा मला आवडली नाही. ते कोण आहेत याची पर्वा न करता माझं समर्थन नाही. ते दुर्दैवी आहे’ अशा शब्दांत त्यांनी कमळनाथांची कानउघडणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आज देशवासियांशी संवाद; महत्वाच्या घोषणांची शक्यता !
- ‘अजितदादांनीच आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी’
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी- मलिक
- ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील


