Share

‘धनंजय मुंडेने कितीही बचाव केला, तरी नियती त्याला सोडणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांना एट्रोसिटी प्रकरणी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या गाडीत रविवारी पिस्तुल आढळल्याने परळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईही केली आहे. तथापि, धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असे दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाइव्ह करत सांगितले होते. त्यानुसार वैजनाथ मंदिरात आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. या नंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळली.

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे

तर भाजपचे नेते निलेश राणे यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचे दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

या व्हिडिओ सोबत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत टीकाही केली आहे. ‘करुणा मुंडेची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. मंत्री मुंडे ने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही’ या शब्दात निलेश राणे यांनी ट्विट करत करुणा यांच्या मदतीला धाव घेतल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!