Share

सुडभावनेने कितीही कारवाया झाल्या तरी मराठ्यांच्या हक्काचा लढा लढणारच; मराठा आंदोलकाचा ‘ठाकरे सरकार’ला इशारा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलनापासून मी सातत्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या कुटुंबाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. प्राणाची आहुती देणाऱ्या भावांच्या कुटूंबियावर आज उपासमारीची वेळ आली आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या लेकराबाळांच्या डोक्यावरून सरकारने मायेचा हात फिरवण्याऐवजी राजकीय नेते आणि अधिकारी संगनमताने सुडभावनेने ६ महिन्यासाठी माझ्यावर प्रतिबंदी घालून, त्या बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या मागणीच्या मुळावरच घाव घालत असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, बापाचे छत्र हरवलेल्या मुलांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याऐवजी सरकारने त्यांना रस्त्यावर आणून सोडले आहे. हि असली कसली दळभद्री सरकारी यंत्रणा आहे. जगण्यासाठी आणि न्यायासाठी आक्रोश करून हंबरडा फोडणारे संकटात सापडलेले कुटुंबिय आणि त्यांच्याही प्रश्नावर सुडभावनेने, आकसाने राजकारण करणारे आधिकारी हे असले कसले नास्तिक विचार आहेत.

मराठे याचा जाब विचारण्यासाठी शांत बसतीलच कसे, आता तर मराठे गुप्त बैठका घेऊन तुमच्या स्वागताला लवकरच येणार आहे. फक्त वेळ येऊ द्या, आज आमचा मराठ्यांचा लढा तुम्ही पुढाऱ्यांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी बंद पाडला आहे. कितीही कारवाया केल्या तरीही मी मराठ्यांच्या हक्काचा लढा लढणारच असा रोखठोक इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!