Share

ऑक्सिजन अभावी राज्यात एकही मृत्यू नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना काळात मृत्यू झाले असले तरी या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती देत याबाबत सरकारने कोर्टात लेखी शपथपत्र दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ऑक्सिजन तुटवडा भासू नये यासाठी औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन सुद्धा वैद्यकीय कारणासाठी उपलब्ध करून दिला. ऑक्सिजनचा काटकसरीने वापर केला , यासाठी वॉर्डात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबविली गेली असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

नाशिक सारख्या घटनेत तर उलट ऑक्सिजन टॅंक भरलेला होता मात्र वेल्डिंग सारख्या काही तांत्रिक कारणाने गॅस लीक झाला त्यामुळे दुर्घटना घडली मात्र ऑक्सिजन कमी पडला नाही. ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू न झाल्याचे शपथपत्र आम्ही कोर्टात दाखल केले आहे असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!