Share

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे सामूहिक संक्रमण नाही: मंत्री शंभूराज देसाई

Published On: 

🕒 1 min read

सातारा: साताऱ्यातील वाई शहरात कोरोनाचे प्रमाण अधिक असून कडक लॉकडाऊनचे पालन तिथे केले जात आहे. तर आज जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग व टाळेबंदीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी वाई शहरास भेट दिली. दरम्यान, लॉकडाऊनचे कडक पालन या भागात केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या आढावा दौऱ्यावेळी  आमदार मकरंद पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर-चौगुले, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, तहसीलदार रणजित भोसले, गट विकास अधिकारी उदयकुमार कसुरकर, डॉ संदीप यादव, मुख्याधिकारी विद्या पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा व आशिष शेलार आदींकडून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

मोठी बातमी : देशातील ‘हे’ राज्य पूर्णपणे झालं लॉकडाऊन मुक्त

सातारा जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत असून त्यादृष्टीने टाळेबंदी हाच उपाय असल्याचे सांगत देसाई म्हणाले, २२ जुलै नंतर टाळेबंदीतून कोणत्या बाबींना शिथिलता द्यायची याचा आढावा जिल्ह्यात जाऊन घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. त्यासाठी कडक उपाय योजना करण्यात येणार आहेत.

कमी चाचण्यांमुळेच कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक – देवेंद्र फडणवीस

वाई शहर पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे. येथील रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यावर आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी आदींशी विचार विनिमय करून त्यात अत्यावश्यक बाबींसाठी शिथिलता दिली जाईल. नगरपालिकांकडे राखीव ठेवण्यात आलेल्या कोविडं निधी बाबत स्पष्ट निर्देश नसल्याने ही रक्कम खर्च करता येत नाही, यासाठी नगरविकास मंत्री व सचिवांशी बोलून मार्गदर्शन घेत आहे. यामुळे पालिकांना निधी खर्च करता येईल, या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत : नीलम गोऱ्हे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!