बंगळुरु : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. विविध राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की आता लोकांनी कामावर परतण्याची गरज आहे. राज्याची अर्थव्यवथाही महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवत आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, यापुढे कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रतिबंध असतील.
कमी चाचण्यांमुळेच कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची सातत्याने होणारी वाढ मोठी चिंतेची बाब ठरत आहे. मात्र कोरोनाच्या वाढणाऱ्या आकडेवारी दरम्यान एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूचं प्रमाण 20.4 इतकं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. जगात हा सर्वाधिक कमी मृत्यूदर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात सध्याच्या घडीला 10 लाख लोकसंख्येमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 837 इतकी आहे. ही संख्या जगातील इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे.
कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत : नीलम गोऱ्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

