मुंबई : मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे निधन. ते 83 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रवी पटवर्धन हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
अखेरच्या श्वासापर्यंत कलेवर प्रेम करणाऱ्या याच कलासक्त अभिनेत्याच्या जाण्याचं दु:ख अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्यक्त केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत रवी पटवर्धन यांना त्यांनी श्रद्धांजली वाहत असताना त्यांना भावना अनावर झाल्या. जड झालेला त्यांचा आवजच हे सांगून जात होता. ‘अग्गं बाई सासूबाई’ या मालिकेच्या निमित्तानं धीरगंभीर आवाजाच्या रवी पटवर्धन यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. याच मालिकेत निवेदिता सराफ यांनीगी पुन्हा एकदा त्यांच्यासोबतच काम करण्याची संधी मिळवली. नकळतच मालिकेच्या निमित्तानं या दोन्ही कलाकारांमध्ये एक सुरेख नातंही आकारास आलं. हे नातं होतं वडील मुलीचं, गुरुशिष्याचं.
एक सुरेख नातंही आकारास आलं. हे नातं होतं वडील मुलीचं, गुरुशिष्याचं. रवी काका आपल्यात नसले तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कामावर असणारी निष्ठा या गोष्टी मात्र कायमच आपल्यात असतील. किंबहुना आपणही त्यांच्याचप्रमाणं कामावर अमाप प्रेम करत, एकनिष्ठ राहण्याचा आणि कोणतंही आव्हान पेलत खचून न जाता नव्या जोमानं उभं ठाकण्याची त्यांची वृत्ती आत्मसात करु, हीच त्यांच्यासाठी माझ्याकडून देण्यात आलेली श्रद्धांजली असेल असं निवेदिता सराफ म्हणाल्या.
https://www.instagram.com/tv/CIfLN-Lp5jx/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- आज शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’: राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट…
- आज शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’, देशभरातून बळीराजाला समर्थन !
- भारत बंद विरोधात कंगना म्हणाली…
- डिसले गुरुजी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्कार
- भारत बंद विरोधात केंद्राला पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरा; विखेंचं शेतकऱ्यांना आवाहन

