टीम महाराष्ट्र देशा : ”नितीन नांदगावकर हे पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते होते. त्यांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली. त्यांना काही अडचणी होत्या तर त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, त्यांना भविष्यात याची नक्की जाणीव होईल, असे मत ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. गेल्या आठवड्यात नांदगावकर यांनी मनसेला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सर्वांनाच धक्क बसला होता.
तर ” राज ठाकरे यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही, राज ठाकरे दैवत आहेत आणि राहतील. मात्र त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला,” असा आरोप नांदगावकर यांनी पक्ष सोडताना केला. मनसेच्या वाहतूक शाखेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत नांदगावकर यांनी 2 ऑक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे संभाव्य उमेदवार मानले जात असताना तिकीट कापल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती. परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत.
गेले काही वर्षे नितीन नांदगावकरांनी बेशिस्त रिक्षा आणि टँक्सी चालकांना मारहाण केल्यामुळे चर्चेत होते. तर आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न मांडल्यामुळे ते प्रवाशांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी काही काळ तडीपारही केलं होतं. नांदगावकाराना मनसेकडून विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट ही मिळणार होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181481489818669056?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181450463389995008?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181446252577226752?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

