Share

केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये नितीन गडकरींनी मध्यस्थी करावी; नितीन राऊतांची इच्छा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर:- केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये होणाऱ्या आजच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. हे मुद्दे निकालात निघावेत यासाठी ‘मधला मार्ग’ शोधून सर्व संभाव्य पर्यायांवर चर्चा केल्याचं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय. बैठकीत जो निर्णय होईल तो देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असेल, असंही कृषीमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाला ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संपन्न झालं. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब, नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. त्यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आपण तोडगा काढावा, अशी मागणी राऊत यांनी गडकरींकडे केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!