Share

कोरोनावर लवकरच लस मिळेल, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

Published On: 

मुंबई : भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ९२९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा आकडा ३ लाख २० हजारांवर पोहचला आहे. संक्रमणामुळे एका दिवसात ३११ लोकांचा मृत्यू होऊन आतापर्यंत मृतांचा आकडा ९ हजारांवर गेला आहे. देशात १ लाख ४९ हजार ३४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तर १ लाख ६२ हजार ३७८ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

याच कोरोना संकटावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. देशात कोरोना संकट आणखी जास्त काळ टिकणार नाही. आपले वैज्ञानिक आणि इतर शास्त्रज्ञ दिवसरात्र कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच कोरोनावर लस शोधली जाईल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. ते गुजरात जनसंवाद संमेलनात बोलत होते.

धनुभाऊ लवकर बरे व्हा ! युवक औरंगाबादहून भगवान गडावर मशाल घेऊन निघाला

दरम्यान, आमच्या सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. देशभर लोकांना अन्नधान्य वाटत करण्यात आले आहे. सर्व गोष्टीचं नाटक करता येते पण पैशाचे नाटक करता येत नाही. ज्यांना सर्वांना बरोबर घेऊन चालायचे आहे त्यांना विचारही करावा लागतो. वाटून टाका असे म्हणणे सोपे आहे. अस परखड वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी केले आहे. नुकतेच एका वृत्त वाहिनीशी बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची ‘ठाकरे सरकार’वर घणाघाती टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!