Share

बीड ते अहमदनगर महामार्ग चौपदरीकरणाला नितीन गडकरींकडून हिरवा कंदील

Published On: 

🕒 1 min read

बीड : भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नागपूर येथे जाऊन रस्ते विकास आणि वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र.५६१ या अहमदनगर ते बीड या एकूण १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रुपयांच्या रस्ते कामास मंजुरी मिळणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

आ.सुरेश धस यांनी शिष्टमंडळासह मंत्री गडकरी यांची भेट घेतली. गडकरी व आ.धस यांच्यात याबाबत जवळपास अर्धा तास सविस्तर चर्चा झाली. बीड ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी दर्जाच्या कामास मंजुरी मिळावी, तसेच या संपूर्ण रस्त्यावरील अपघातस्थळ असलेल्या जागी रुंदीकरण तसेच प्रमुख गावाजवळ सर्व्हिस रोड करणेबाबत ही सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरच कामास मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

खत-बियाणेसंदर्भात आ.धस यांच्या ‘महाबीज’ला सूचना
बियाण्यांची कमतरता, उपलब्ध झालेच तर दर्जाहीन बियाणे आदी प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावतात. अशा स्थितीत बियाण्याच्या कमतरतेवरून पेरणीचा काळ लांबल्याचा गोंधळ गेला काही वर्षांपासून पाहण्यास मिळत आहे. याच अनुषंगाने अकोला येथील महाराष्ट्र राज्य महाबीज मंडळ येथे मुख्य व्यवस्थापकांची भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस भेट घेतली. मराठवाडा विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणीसह सर्व जिल्ह्याना खत – बियाण्यांचा तुटवडा भासू नये असे पूर्वनियोजन करण्याबाबत आमदार धस यांनी अकोलास्थीत मंडळाच्या कार्यालयात मुख्य व्यवस्थापक फुंडकर यांच्याकडे मागणी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!