नवी दिल्ली : देशातील अपघातांच प्रमाण वाढण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण असते ते म्हणजे रस्त्यांची अवस्था या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे,
आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार पार पडला यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘देशातील रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा हवाला देत गडकरी यांनी ही गोष्ट करोना महामारीपेक्षाही गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.’
‘रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांपैकी १८ ते ४५ या वयोगटातील काम करणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणे ७० टक्के आहे. देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती करोना महामारीपेक्षाही जास्त गंभीर आणि पुढील काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते,’ असं गडकरी म्हणाले.
दरम्यान, ‘आता देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या महामार्गांचं ऑडिट करून त्यातील चुका आणि उणीव शोधून काढण्यात येतील. दुरूस्त करण्यात येईल. हे दुर्दैव आहे की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतानंतर अमेरिका आणि चीनचा क्रमाक लागतो. परिवहन मंत्री म्हणून या गोष्टीबद्दल मी खूप संवेदनशील आणि गंभीर आहे,’ असं नितीन गडकरी म्हणाले.त्याचबरोबर डीपीआर सक्षम प्राधिकरणाकडून तपासले जायला हवेत आणि त्यात बदल केले जायला पाहिजे, तटस्थ एजन्सी आणि शैक्षणिक संस्थांकडून हे बघितले गेलं पाहिजे,” असं गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर


