Share

‘तेरणा’, ‘तुळजाभवानी’ भाडे तत्त्वावर देण्यासाठी पीएफचा अडसर दूर

Published On: 

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा व तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा अडसर दूर झाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. कारखाने भाडे तत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँक, आवसायक व भाडेतत्त्वावर घेणारी संस्था यामध्ये जो करार होणार आहे, त्यामध्ये प्रथम प्राधान्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयास देय असणारी रक्कम देण्याची तरतूद करून येणाऱ्या अनामत ठेवीतून प्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे देणे देण्यात येईल असे ते म्हणाले.

पत्रकात म्हटले आहे की, मी अधिवेशनामुळे मुंबईत असल्याने माझ्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा तेरणा बचाव संघर्ष समितीचे सदस्य निहाल काझी यांना योग्य त्या सूचना देऊन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सहाय्यक आयुक्त पुरुषोत्तम मीना यांची भेट घेण्यास पाठविले. भेटीत मुख्यत: थकहमीच्या रक्कमेतून बाकी भरणे व राज्य सरकारच्या हमी शिवाय संमती देण्याबाबत चर्चा झाली.

कारखाने भाडे तत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँक, आवसायक व भाडेतत्त्वावर घेणारी संस्था यामध्ये जो करार होणार आहे, त्यामध्ये प्रथम प्राधान्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयास देय असणारी रक्कम देण्याची तरतूद करून येणाऱ्या अनामत ठेवीतून प्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे देणे देण्यात येईल. या अटीवर कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सहमती द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने जिल्हा बँक व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्यात परस्पर सहमतीने तडजोडीचे मुद्दे दाखल करुन सर्व न्यायालयीन बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची बाकी वसूल होण्याच्या दृष्टीने हा उत्तम पर्याय असून, बँकेच्या हमीवर कारखाने भाडे तत्वावर दिल्यानंतर येणाऱ्या अनामत ठेवीमधून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची थकबाकी जमा करुन घेण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाच्या परवानगीने संमतीपत्र देण्याबाबत मुद्देसुद चर्चा झाली व सहाय्यक आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी याबाबत तयारी दर्शविली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!