Share

सायन रुग्णालयात घडलेल्या ‘त्या’ धक्कादायक प्रकाराबाबत आ. नितेश राणे भडकले, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ हा व्हायरल झाला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आ. नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

याबाबत बोलताना राणे म्हणाले, ‘तो व्हिडीओ सायन रुग्णालयातील असल्याची कबुली रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दिली आहे. काही जणांचे नातेवाईक त्यांचे मृतहेद घेण्यासाठी आले नाहीत म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी ठेवले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांनी कसली अपेक्षा ठेवावी? खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे. ही आरोग्य आणीबाणी आहे,’ असं राणे म्हणाले.

तसेच पुढे ट्विटमध्ये राणे म्हणतात, ‘काल रात्रीपासून सायन रुग्णालयाकडून हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता त्यांनी यावर धक्कादायक उत्तर दिलं आहे. पालिका प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर आता विश्वास राहिला नाही. जर परिस्थिती हाताळणं जमत नसेल तर पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,’ असं राणे म्हणाले आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे आणि मिलिंद देवरा यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या 

हाच का तुमचा सायन पॅटर्न ? भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला केले लक्ष्य

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!