मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पवार यांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांच्यावर ऑपरेशन केले.
पवार यांना आज रुग्णालयात दाखल करुन त्यांची एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी रात्रीच पवार यांच्या पोटात जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम राणेआणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे आले होते.
यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. त्यांनी ट्वीटकरत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दरम्यान पवारांवर शस्रक्रीया होत असताना रूग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहीत पवार उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी केले रोहित-विराटमध्ये पॅचअप
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- गृहमंत्र्यांकडून त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्यानं फोर्सवर दबाव टाकला जात होता, परमबीर सिंहांची कोर्टात माहिती
- दीपालीच्या चव्हाण प्रकरणात एमएस रेड्डी यांना सहआरोपी करण्याची मागणी का होतेय ?
- ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून पहिजेल’ ; पहा चाहत्याच्या कमेंटवर राजेश्वरीचा भन्नाट रिप्लाय


