नवी दिल्लीः अनलॉक नंतर वाहन उद्योग आणि वाहन खरेदी यानां गती मिळाली आहे. तर आता वर्षाच्या शेवटी कार खरेदीदारांकडून नवीन वर्ष आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कार खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे आता कार कंपन्याकडून बाजारात गाड्यांचे नवनवीन मोडेल्स आणल्या जात आहेत. त्यामुळे कार कंपन्यांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे.
या स्पर्धेत सध्या निस्सान, कियानंतर आता मारुती सुझुकी च्या या कारचे कुप किंवा मिनी क्रॉस ओव्हरसारखे डिझाईन असण्याची शक्यता आहे. निस्सान इंडियाने नुकतीच ४.९९ लाख एवढ्या कमी किंमतीत निस्सान मग्नाईट लाँच केल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे फोर्ड या सेगमेंटचा पायोनिअर असला तरीही किया आणि ह्युंदाई या सेगमेंटमध्ये पाय पसरू लागले आहेत.
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयुव्हींनी वेगाने पकड मिळविली आहे. यामुळे कंपनी या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी देखील आणखी एक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. तर ह्युंदाईकडे देखील व्हेन्यू आणि कियाकडे सोनेट या अद्ययावत कार आहेत. या कारनी भारतीय बाजारात वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केल्याने मारुतीलाही आता नवीन कारची गरज भासू लागली आहे.
ही नवीन कार अंतर्गत रचनेत बलेनोसारखीच असणार आहे. यामध्ये जास्त बदल केला जाणार नाही. मात्र, डिझाईन आणि बाहेरील रचना ही काहीशी एसयुव्ही सारखी असणार आहे. यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऑटो कंपन्या त्यांच्या ताफ्यातील कार वाढविण्यासाठी या योजना आखतात. यामध्ये एखाद्या पॉप्युलर प्लॅटफॉर्मवर नवीन कार बनविली जाते. यामुळे बाजारात लवकर पकड बनविता येते.
वायटीबी ही कंपनीची दुसरी कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. मारुती सुझुकी वितारा ब्रीझा ही कंपनीची पहिली एसयुव्ही आहे. ही कार २०१६ मध्ये लाँच करण्यात आली होती. मारुतीला या सेगमेंटमध्ये विस्तार करायचा आहे.
निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामुळे मारुती, टाटाला जोरदार टक्कर ज्ञात येत आहे. यामध्ये निस्सान मग्नाईटची किंमत स्विफ्टपेक्षाही स्वस्त, म्हणजे 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केले आहे.
ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. कारण त्या नंतर कार्सच्य किंमतीत वाढ होणार आहे. भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- दूरसंचार विभागाच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी

